लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

अनिल अंबानींची स्थिती हलाखीची; कोर्ट केसेस लढण्यासाठी पत्नीचे दागिने विकले

लंडन : दिवाळखोरीत गेलेल्या उद्योजक अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. न्यायालयीन खटले लढण्यासाठी पत्नीचे दागिने विकावे लागल्याची कबुली अनिल अंबानी यांनी लंडनमधील न्यायालयामध्ये दिली आहे. करोडपती ते रोडपती असा अंबानी यांचा प्रवास त्यांचे औद्योगिक साम्राज्य खालसा झाल्याचे अधोरेखीत करत आहे.

अंबानी यांनी चीनमधील तीन ४ हजार ७६० कोटीचे बँकांकडून कर्ज घेतल आहे. त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. त्यावर झालेल्या सुनावणीत अंबानी यांनी आपली बिकट आर्थिक परिस्थिती न्यायालयात कथन केली. अंबानी म्हणाले की, ”मी एक सामान्य जीवन जगत आहे. एकच गाडी वापरत आहे. आता पूर्वीसारखे माझे आयुष्य सुखासुखी राहिलेले नाही. इतकंच काय तर न्यायालयीन खटल्यांचा खर्च हा पत्नीचे दागिने विकून भागवला आहे”, अशी कबुली त्यांनी दिली. मागील सहा महिन्यात पत्नीचे ९ कोटी ९० लाखांचे दागिने विकले आहेत. आता स्वतःजवळ काही किंमत ऐवज उरलेला नाही, असेही अंबानी यांनी न्यायालयाला सांगितले.

सोने दरात घसरण सुरूच; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त
आपली आर्थिक हलाखी कथन करताना त्यांनी माध्यमांवर खापर फोडले आहे. माझ्या श्रीमंतीविषयी माध्यमांनी अफवा पसरवल्या, माझ्याजवळ कधीच रोल्स रॉयस ही आलिशान मोटार नव्हती. आताही केवळ एकच कार आपल्या सोबत आहे, असे अंबानी यांनी सांगितले. या सुनावणीत पत्नी टीना अंबानी यांच्या मालमत्तेचा तपशील मागण्यात आला. तसेच अनिल अंबानी यांना खासगी हेलिकॉप्टर , याॅट, लक्झुरी मोटार, लंडन, कॅलिफोर्निया आणि बिजिंगमधील शाॅपींगसंबधी प्रश्न विचारण्यात आले.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani राष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022 महाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन ? | children day 2022 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj