लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर; अंतिम सामना खास दिवशी

आयपीएल २०२० प्रमाणे आयपीएल २०२१चे उर्वरित सामने तीन शहरांमध्ये होणार

लोकवार्ता।प्रतिनिधी

पुणे : कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल २०२१ चे १४ वे सत्र आता यूईमध्ये पूर्ण होईल. बायो बबलमध्ये कोरोनाच्या प्रवेशानंतर २९ सामन्यांनंतर लीग पुढे ढकलण्यात आली. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली. आता या लीगच्या आयोजनाची तारीखही समोर आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर अशा कालावधीत आयपीएल २०२१चा उर्वरित टप्पा खेळवण्यात येणार आहे. लीगचा अंतिम सामना १५ तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी होणार आहे.

http://silversakshi.in/

आयपीएल २०२० प्रमाणे आयपीएल २०२१चे उर्वरित सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये होणार आहेत. यासंदर्भात दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी त्यांची संमती दर्शविली आहे.

बीसीसीआय आयपीएल २०२१चे उर्वरित सामने २५ दिवसांत घेणार आहे. डबल हेडर सामने कमी करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये उष्णता जास्त असल्याने खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागेल. बीसीसीआयने हा टप्पा २५ दिवसात संपवला, तर ८ डबल हेडर सामने कमी होतील.

पॅट कमिन्स आयपीएलबाहेर
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएलच्या उर्वरित हंगामात न खेळण्याचे म्हटले आहे. सध्याच्या मोसमात कोलकाता संघाला चांगली कामगिरी करता आली नसल्यामुळे हा संघाला दुहेरी धक्का मानला जाऊ शकतो. संघाने यंदा ७ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत. कोलकाता पॉइंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani