केळ्याचे सेवन रात्री करावे की नाही? जाणून घेऊया

केळे हे शरीर स्वास्थ्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्याचे फायदे सुपर फूड प्रमाणे आहेत. परंतु, रात्रीच्या वेळी केळ्याचे सेवन केले पाहिजे की नाही? यावर डाएट एक्स्पर्टस वेगवेगळे विचार मांडतात. आयुर्वेदानुसार, केळ्याचे सेवन रात्री करू नये. तुमचा प्रश्न हाच असेल, की केळ्याचे सेवन रात्री करावे की नाही? तर तुम्हाला केळ्याचे फायदे आणि नुकसान याचबरोबर केळ्याचे सेवन कधी केले पाहिजे, हे पण जाणून घेणे जरूरी आहे. चला तर मग बघूया एक्स्पर्ट्स काय म्हणतात ते:
केळे हे तब्येतीसाठी खूप फायदेशीर आहे. शरीराच्या पोषणासाठी केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, पोटॅशियम, आणि ऊर्जा असते. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी केळे उपयोगी आहे. केळ्यामध्ये हेल्दि फायबर असल्यामुळे ते भूक नियंत्रित करते. पचनसंस्था सुरळीत काम करण्यासाठी केळे फायदेशीर आहे.
शरीरास लवकर ऊर्जा मिळण्यासाठी केळे हे सुपर फूड प्रमाणे आहे. रोज केळ्याचे सेवन केल्यामुळे पचंनाबरोबरच चयापचय क्रिया उत्तम रीतीने काम करते. उत्तम चयापचय क्रिया ही वजन कमी करण्यास मदत करते. केळे खाण्यामुळे गोड खाण्याच्या सवयीपासून सुटका होते.
डाएट एक्स्पर्टच्या मते रात्री केळ्याचे सेवन हे नुकसानकारक नाही, पण तरी रात्री केळे खाण्यापासून स्वत:ला सांभाळा. कारण रात्री केळे खाल्ल्यामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार होऊ शकतात. केळे पचण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे रात्री केळ्यासारख्या जड पदार्थांचे सेवन करू नये.
ज्या लोकांना वारंवार सर्दीचा त्रास असतो, त्यांनी केळ्याचे सेवन रात्री करू नये. तसेच, रात्री शरीराला खूपच कमी ऊर्जेची जरूर असते, आणि केळ्यामध्ये बरेच पोषण तत्वे आणि खूप ऊर्जा असते, म्हणून रात्री केळ्याचे सेवन करू नये. काही डाएट एक्स्पर्ट्सचे असे म्हणणे आहे, की तुम्हाला जर कोणताही आजार नसेल, तर तुम्ही कोणतेही फळ कोणत्याही वेळी खाऊ शकता. परंतु, यावर आयुर्वेद असे म्हणतो, की केळ्यात कफ तयार करण्याचा गुणधर्म आहे, त्यामुळे, थंडीच्या दिवसात रात्री केळे खाणे शरीरास अपायकरक आहे. त्यामुळे तुम्हाला स्वस्थ झोप लागणार नाही.
केळे कधी सेवन केले पाहिजे : यासंबंधी आयुर्वेद तसेच डाएट एक्स्पर्ट्सचे असे मत आहे, की केळ्यामध्ये फायबर आणि कॅल्शियम बरोबरच पॉटाशियमची मात्रा जास्त असते. सकाळी न्याहारीच्या वेळी केळे खाणे अत्यंत फायदेशीर आहे. सकाळी न्याहारीच्या वेळी केळ्याचे सेवन केल्यामुळे शरीरास पूर्ण दिवस ऊर्जा किंवा एनर्जि मिळते. त्याशिवाय, शरीरास जरूरी असलेले पोषणसुद्धहा केळ्यामुळे मिळते.
रात्री झोपण्यापूर्वी गोड फळांचे सेवन करू नये. म्हणूनच, हे योग्य आहे, की रात्री झोपताना केळ्याचे सेवन करू नये. केळ्याचा जर खरच फायदा करून घ्यायचा असेल, तर ते सकाळी न्याहरीत किंवा दुपारी जेवताना सेवन करावे. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.