लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

ग्रामपंचायत पोट निवडणुकांच्या तारखा जाहीर

-५ जुन ला मतदान तर ६ जून ला मतमोजी होणार.

पिंपरी । लोकवार्ता
राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 5 जून रोजी मतदान तर 6 जून रोजी मतमोजणी होणार आहे. तहसिलदारांनी निवडणूकीची नोटीस 5 मे 2022 प्रसिद्ध करावी, असेही सांगण्यात आले आहे. उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे 13 मे ते 20 में या कालावधीत 14 मे, 15 मे तसेच 16 मे ची सार्वजनिक सुटी वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या वेळेत सादर करता येणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून होईल आणि छाननी संपेपर्यंत ही प्रक्रीया चालेल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 25 मे असून वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

वेळ व तारखा खालीलप्रमाणे
मतदान 5 जून रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत राहील. मतमोजणी 6 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 9 जून 2022 पर्यंत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. जिल्हयात 222 ग्रामपंचायतीमधील एकूण 243 रिक्त जागेची पोट निवडणूक होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे. त्यामुळे काही प्रभागातील ग्रामपंचायचींच्या निवडणुकांचे बिगूल पुन्हा वाजले आहे. पुन्हा वॉर्डातलं राजकारण तापणार आहे. हे स्पष्ट झालं आहे. गावगाड्याच्या राजकारणात पुन्हा मोठ्या हलचाली पहायला मिळणार आहेत.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani