मराठी पञकार परीषदेचे 43 वे आधिवेधन पिंपरी चिंचवड मध्ये पडणार पार; आज देण्यात आले अधिवेशनाच्या उदघाटनाचे मुख्यमंत्र्यांना निंमञण
लोकवार्ता : दि. 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी पुणे पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेटून अधिवेशनाच्या उद्घाटनाचे प्रत्यक्ष निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांनीही या अधिवेशनात उपस्थिती लावण्याचे शब्द शिष्टमंडळात दिले आहे.

मंत्रालयात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस.एम.देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मराठी पञकार परीषदेचे 19 व 20 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे होणाऱ्या 43 व्या अधिवेशनाचे निमंत्रण त्यांना दिलं. मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी आपण उदघाटन समारंभास उपस्थीत राहण्याचा शब्द दिला यावेळी मुंबाई विभागीय सचिव दीपक कैतके, माजी कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, राज्य संघाटक सुनील वाळुंज हे हि यावेळी उपस्थीत होते.