मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; ट्रक ड्रॉयव्हरचा मृत्यू
लोकवार्ता : आज सकाळी ९. च्या सुमारास मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात खोपोली येथे एका ट्रकने कार, एसटी आणि कंटेंटरला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन किरकोळ जखमी झाले आहेत.

खोपोली पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात आज सकाळी घडला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने तो पुढे असलेल्या कारला आणि एसटी ला धडकला. त्यानंतर तो ट्रक एका कंटेनर ट्रकला जाऊन जोरदार धडकला. त्याचा पुढचा भाग पूर्ण चकाचूर झाला असून ट्रक ड्राइवर त्यात अडकून मरण पावला.
कारमधील एकास तसेच बसमधील एकास किरकोळ जखमा झाल्या आहेत. मयत ड्राइवर व दोन्ही जखमी व्यक्तींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. तेथेच जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.