शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर.
महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली माहिती.
पिंपरी ।लोकवार्ता-
मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं ४ ऑक्टोबर पासून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेले होते. आता हे वर्ग पुन्हा बंद राहतील.राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध धार्मिक सण आणि उत्सवांकरीता सुट्ट्या जाहीर करण्यात येत असतात. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शासनाने सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

सण २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना दिनांक २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सुट्ट्या घोषित केल्या आहेत. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरु असलेले वर्ग बंद राहतील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ दरम्यान दिवाळी सणाची सुट्टी असेल.या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाइन अध्यापनही बंद राहील. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!–वर्षा गायकवाड.
