दहावी च्या निकालात मुलींची बाजी ; कोकणाचा सर्वाधिक निकाल, यंदा ९६.९४ टक्के निकाल
SSC 10th Result 2022 : दहावी च्या निकालात मुलींनी बाजी मारली असून कोकणाचा सर्वाधिक निकाल लागला आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेला १० वी चा निकाल अखेर लागला. यंदा ९६.९४ टक्के निकाल लागला आहे. सालाबादप्रमाणे या निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. कोकणाचा सर्वाधिक निकाल लागला असून या निकालात राज्यात कोकण अग्रस्थानी आहे. तर नाशिकचा सर्वात कमी निकाल लागला आहे.
तसेच राज्यातील १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. आज दुपारी १ वाजता सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहता येणार असल्यानं आता विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.