ब्रेकिंग..! दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली , उद्या १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर
लोकवार्ता : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या १७ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती, अटी, शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
‘या’अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येईल-
http://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in https://lokmat.news18.com