पुणे विमानतळ विस्ताराला 13 एकर जागेची मंजुरी !
पुणे | लोकवार्ता-
पुणे विस्ताराला १३ एकर जागेची मंजुरी मिळाल्यामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याचा विमानतळाशेजारची BSO यार्डाची १३ एकर जागा भारतीय विमानतळ प्राधिकरणाला देण्यास संरक्षण विभागाची मंजुरी मिळाली आहे.
विमानतळावर विमानांची उड्डाण संख्या वाढवता येणार असल्यामुळे पुणे देशातील सर्व प्रमूख शहरांना जोडले जाणार आहे.

कार्गो टर्मिनल उभारणे शक्य आहे त्यामुळे देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीस चालना मिळणे शक्य होणार आहे.
कार्गो सेवेचा थेट फायदा पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी व औदयोगिक क्षेत्राला होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्याच्या अवकाश भरारीला नवे बळ दिल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि देशाचे व्हिजनरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले आभार- आमदार महेश लांडगे