“तळवडे रुपीनगर येथील १५०० मुलांना सिंहगडाची सफर”
-तळवडे येथील भाजप माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांचा ऐतिहासिक उपक्रम.
तळवडे।लोकवार्ता-
बालदिनाचे औचित्य साधून तळवडे येथिल माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांच्यावतीने तळवडे येथील बालमावळ्यांना सिंहगडाची नुकतीच सफर घडविण्यात आली. छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि आईसाहेब जिजाऊंचे संस्कार सर्वांच्या नसानसांत भिनविण्यासाठी तसेच गडकिल्ले संवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

यात तळवडे परिसरातील तब्बल पाचशे मुले सहभागी झाले होते. अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने या सहलीची सुरुवात झाली. सुरक्षित प्रवास करत सर्व बालमावळ्यांना संपूर्ण शिवनेरीचे दर्शन घडवण्यात आले.. अनुभवी ट्रेकर्स व अभ्यासकांच्या माध्यमातून लहान मुलांना सिंहगड बाबत माहिती, छत्रपती शिवरायांचा इतिहास व त्यांचा पराक्रम सांगण्यात आला. सर्व मुलांनी अतिशय जल्लोषाच्या वातावरणात सिंहगडाची सफर पार पडली.
