वेदिकाला दिली १६ कोटींची लस
शिंदे कुटुंबीयांनी मानले जनतेचे आभार

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी : वेदिका सौरभ शिंदे या SMA TYPE 1 हा दुर्मिळ आजार झालेल्या ११ महिन्यांच्या बाळाला zolgensma ही लस अमेरिकेतून आयात करून देण्यात आली. वेदिका ला २ दिवसांपूर्वी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. त्यानंतर सर्व गरजेच्या चाचण्या डॉक्टरांनी करून घेतल्या वेदिकाचे सर्व चाचण्या व्यवस्थित असल्याची खात्री करून त्यानंतर लस देण्यात आली. तिची प्रकृती चांगली आहे. हे वन टाईम जिनथेरेपी असल्याने सिंगल डोस इंजेक्शन दिलं जाणार आहे.
या लसीवरील आयात शुल्क माफ करण्या करिता वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य भवन विभागाशी व केंद्रीय वित्त मंत्रालया बरोबर पत्रव्यववहार केला होता. याची दखल घेवुन केंद्र सरकारने आयातशुल्क व कर माफ केले आहे. यासाठी सिने-अभिनेते निलेश दिवेकर अणि मंत्री-महोदय श्री नितिन गडकरी साहेब यांचे सचिव संकेत भोंडवे यांचे योगदान मोलाचे होते अशी माहिती वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी दिली.
वेदिका अवघी ८ महिन्यांची असताना तिला SMA TYPE 1 हा दुर्मिळ आजार झाला असल्याचे निदर्शनास आले या आजारावर zolgensma ही लस देणे गरजेचे होते त्याप्रमाणे एका सामान्य कुटुंबातील वेदिकाचे वडील सौरभ आणि स्नेहा शिंदे यांनी जीवाचे रान करून तब्बल १६ कोटी रुपये लोकनिधी व सीएसआर मार्फत जमा केले आणि आज त्या सर्व मेहनतीचे चीज झाले, ज्या दात्यांनी आपल्या आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत केली सर्व जनतेने आशीर्वाद दिले या सगळ्यांच्या कष्टाचे आज फळ मिळाले आणि वेदिकला लस भेटली अशा भावना वेदिका च्या पालकांनी व्यक्त केल्या.
एक खूप अशक्य वाटणारी लढाई शक्य झाली याचे सर्व श्रेय दात्यांना तसेच ज्यांनी ज्यांनी ज्या प्रकारे मदत करता येईल त्या प्रकारे मदत केली अशा सर्व व्यक्तींचे , उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर व त्यांचे सहकारी या सर्वांचे शिंदे कुटुंब शतशः ऋणी राहील , माणुसकी अजूनही जिवंत आहे हेच या १६ कोटींच्या लढाईतून सिद्ध झाले आहे.
मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार अनेक राजकीय मंडळी, पत्रकार तसेच देशातील जनतेबरोबर विदेशातून देखील वेदिका साठी मदतीचा ओघ सुरू होता. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विशेष प्रयत्न करून शक्य तितकी मदत केली, संसदेत अशा आजारांसाठी विशेष तरतूद करावी अशी मागणी देखील केली. भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील यांनी सुरवातीपासून लस मिळे पर्यंत शिंदे कुटुंबासोबत उभे राहून लागेल ती मदत केली असे देखील शिंदे कुटुंबीयांनी आवर्जून सांगितले.