लवकरच वाजणार ‘पहिली ते चौथीची घंटा’
दिवाळीनंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याच्या हालचाली सुरु.
मुंबई।२२ ऑक्टोबर लोकवार्ता-
ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरात आठवी ते बारावी चे वर्ग सुरु करण्यात आले असून आता पहिली ते चौथे चे वर्ग सुरु करणार असल्याच्या हालचालू देखील सुरु झाल्या आहेत . शिक्षण विभागाच्या मंत्री वर्ष गायकवाड यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष्यांसोबत बैठक केली .त्यामध्ये हे मुद्दे मांडले असल्याचे समोर आले आहेत.

अधिकाऱ्यांची चर्चा करताना पालकही उत्सुक असल्याचे समोर आले आहे .जेवढी उत्सुकता विद्यार्थ्यांना आहे तेवढीच उत्सुकता त्यांच्या पालकांनाही आहे. कोरोना काळात बंद असलेल्या शाळा आता लवकर उघडणार म्हणून विद्यार्त्यांमध्ये आनंद आहे. दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली तर सर्व नियमांचे पालन करत शाळा उघडणार असल्याचे शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे
कोरोना काळात ओंलीने अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यंसोबत पालक देखील वैतागले आहेत. गेल्या तब्बल दीड ते दोन वर्ष्यापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. १० नोव्हेंबर नंतर कोरोना राज्य कृती दलाची बैठक बोलवून यात हा निर्णय घेतला जाणार आहे .रुग्णवाढ नसल्यास सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केल आहे .