खडकी मध्ये २००० किलो गोमांस जप्त !
लोकवार्ता : काल (दि.१७) दुपारी १ वाजता खडकी येथे गोमांसाने भरलेला टेम्पो जप्त करण्यात आला आहे. यामध्ये जवळ जवळ २००० किलो गोमांस होते. टेम्पो क्रमांक Mh.05.DK.6079 हा खडकी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांनी टेम्पो चालक नामे सय्यद शोयाब अजीज आणि क्लिनर तन्वीर अहमद कुरेशी दोघे राहणार मुंबई यांना सदर मांसाबाबत चौकशी केली असता त्यांनी सोलापूर येथून गायी आणि बैलाचे मांस आणले असून मुंबई येथे घेऊन जात असल्याचे सांगितले.

पशुवैद्यकीय अधिकारी व पोलिसांच्या मदतीने सदर टेम्पोची शटर वर करून पाहणी केली असतात गोवंशाचे पाय, मांस व अवयव कातडी काढलेल्या अवस्थेत दिसून आली. पोलिसांनी लागलीच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद केला. यासदर्भात मानद पशुकल्यान अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी यांनी फिर्याद दिली. या कारवाईत श्रेयस शिंदे, कृष्णा सातपुते , अनवित अंगिर , हिमांशू घरसुंड , ओमकार बेलीटकर , योगेश बेलिटकर , सचिन मरगले इ गोरक्षकांनी सहभाग घेतला.