खंडोबा कादंबरीला २०२२ चा साहित्य गौरव पुरस्कार जाहीर
लोकवार्ता : वाचनवेल प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा साहित्य गौरव पुरस्कार नितीन थोरात लिखित खंडोबा या कादंबरीला देण्यात आला आहे. काल कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. जेष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
नागरिकांमध्ये पुस्तकाची आवड निर्माण व्हावी, पुस्तक वाचन चळवळीला चालना मिळावी, या उद्देशाने वाचनवेल पुस्तक भिशी सुरु करण्यात आली आहे. याच प्रतिष्ठानतर्फे काल खंडोबा या प्रसिद्ध कादंबरीला साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खंडोबाच्या बालपणावर आधारित हि कादंबरी असून अल्पावधीतच घराघरात या कादंबरीने आपली जागा मिळवली.
याप्रसंगी अच्युत गोडबोले, मनोज अंबिके, अनंत राऊत, प्रेम धांडे, विनम्र भाबल असे दिग्गज लेख आणि कवी उपस्थित होते.