गोरक्षकांमुळे 23 पशूंना कत्तलीपासून जीवदान..!
यामध्ये ३ जणांवर बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पुणे | लोकवार्ता-
गोरक्षकांमुळे 23 पशूंना कत्तलीपासून जीवदान मिळाले आहे. आज दिं. 4.4.2022 रोजी एका पिक अप टेम्पो नं mh.11.bl.7526 ही गाडी पोलिसांच्या मदतीने अडवून पाहणी केली असता गाडीमध्ये शेतीउपयोगी व पुनरुउत्पादनक्षम म्हशीचे रेडकू व पारडी यांचे चारही पाय व तोंडे दोरीने घट्ट बांधून टेम्पोत लाकडी फळ्यांचे दोन मजले करून दाटीवाटीने कोंबून भरलेल्या अवस्थेत दिसून आली…सर्व जनावरे जखमी व अशक्त झालेले होती…पोलिसांनी संबंधित वाजिद कुरेशी , मोहम्मद सलीम कुरेशी व सतीश बबन होळकर यांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यातील कलम 6 व पशुक्रूरता अधिनियम 1960 प्रमाणे गुन्हा दाखल करून सर्व जनावरांना श्री बोरमलनाथ गोशाळा यवत येथे सुखरूप सोडण्यात आले..!

यासंदर्भात गोरक्षक ऋषिकेश देवकाते यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. मानद पशुकल्यानं अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी यांनी यावेळी गोरक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले…या कारवाईत बापुराव देवकाते , हर्षद देवकते , महादेव गाडे , रोहन कुरूगले , युवराज डहाळे यांनी सहभाग घेतला..! वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ढवाण साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य दिले.