रहाटणीत २३ फूट उंच देवीची मूर्ती
लोकवार्ता : रहाटणी येथील नवरात्र महोत्सवामध्ये २३ फूट उंचीच कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीची प्रतिकृती भाविकांसाठी आकर्षण ठरली आहे. भाविकांसाठी दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला असून नागरिक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

रहाटणी येथे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते ब युवानेते शुभम नखाते यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाची सुरुवात झाली आहे. महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रहाटणी परिसरातील अबालवृद्धांसाठी रास गरबा व दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा नवरात्र महोत्सव ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. मागील दोन वर्षे करोनाच्या साथीमुळे राज्यात दांडिया आणि गरब्याला बंदी होती. पण यावर्षी मोठ्या उत्साहाने नवरात्र साजरी केली जात असून दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
नवरात्रोत्सवात विशेषतः तरुणाईमध्ये दांडिया खेळायला गर्दी होताना दिसत आहे. चंद्रकांत नखाते यांनी श्री महालक्ष्मी देवीच्या भव्य प्रतिकृतीसह दिव्यांच्या रोषणाई केल्याने परिसर उजाळून निघाला आहे. तसेच दांडिया खेळायला नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.