पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्या प्रकरणी ३ अधिकारी व ७ कर्मचाऱ्यांना निलंबित
लोकवार्ता : पुण्यातील चिंचवड गावामध्ये चंद्रकांत पाटील हे एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता त्यांच्यावर हा शाई फेकण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षा व्यवस्थेत पोलीस बंदोबस्त चोख असूनही काही लोकांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली.

चंद्रकांत पाटील यांनी ‘फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली,’ असं वक्तव्य केल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झालाय. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करण्याचा भ्याड हल्ला झाला आहे. याप्रकरणी घरात घुसून उत्तर देऊ, असं भाजप नेते राम कदम यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी(9 डिसेंबर) पैठणमध्ये संत विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात भाषण करत होते. यादरम्यान त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ३ अधिकारी व ७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयकत अंकड शिंदे यांनी दिली आहे.