पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उभारण्यात येणाऱ्या इमारतीचा ३१२ कोटींचा निविदा प्रसीद्ध
-तब्ब्ल सात एकर जागेत इमारत बांधण्याचे नियोजन.
पिंपरी । लोकवार्ता-
महापालिकेच्या या चार मजली इमारतीचे उदघाटन तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्या हस्ते 13 मार्च 1987 रोजी झाले होते. त्यानंतर सतत महापालिकेचे विस्तारीकरण करण्यात आले. तीन मजल्यावर अधिका-यांची दालने तर, एका मजल्यावर पदाधिका-यांची दालने आहेत. सध्याची पाहता परिस्थिती लक्षात घेता कार्यालये आणि दालनांसाठी जागा अपुरी पडत आहे. अनेक विभागांची कार्यालये मुख्यालयातून महापालिकेच्या इतर इमारतीमध्ये स्थलांतरित केली आहेत. महापालिकेत वाहनतळ देखील पुरेसे नाही. अधिकारी, नगरसेवकांची वाहनेच पार्क करण्यासाठी जागा अपुरी पडते. महापालिकेचा नोकर भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. नोकर भरतीला मान्यता मिळाल्यास आणि कर्मचारी भरत्यानंतर पुन्हा जागेची कमरता भासणार आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी नवीन इमारत उभारण्यात येणार असून त्यासाठी 312 कोटी 20 लाख 32 हजार 838 रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. दरम्यान, पूर्वी काढलेली 240 कोटी रुपयांची निविदा रद्द केली असून नवीन निविदा 66 कोटी रुपयांनी वाढली आहे.

महापालिकेची चिंचवड स्टेशन या ठिकाणी 35 एकर जागा आहे. त्यापैकी 7 एकर जागेत 13 मजली प्रशस्त पर्यावरणपूरक इमारत उभारण्याचे नियोजन आहे. त्यात महापालिकेच्या विविध विभागासह महापौर, पदाधिकाऱ्यांची दालने असतील. प्रशस्त सभागृह, मीटिंग हॉल, कॅण्टीन, स्वच्छतागृह आणि इतर अशा सोयी असतील. उर्वरित जागेत सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे. भविष्यातील 50 वर्षांचे नियोजन करून या पर्यावरणपूरक इमारतोचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. पाचमजली स्वतंत्र इमारत वाहनतळासाठी असणार आहे. त्यात 500 मोटारी आणि दीड हजार दुचाकी पार्क करता येणार आहेत.