लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

डॉ अमोल कोल्हे यांच्या अथक प्रयत्नांतून भोसरी विकास कामांसाठी राज्यसरकारकडून ४ कोटींचा विकास निधी मंजूर.

राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाला शुभारंभ.

पिंपरी | लोकवार्ता-

खासदार निधी बंद असतानाही कोल्हे यांनी भोसरीतील विकास कामे रखडू नये यासाठी राज्य सरकारकडून विकास निधी आणला. मोदी सरकारने खासदार निधी बंद केला असला तरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे खंबीरपणे आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत.नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, नगरसेविका संगीता ताम्हाणे, पोर्णिमा सोनवणे, विराज लांडे, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, विद्यार्थी शहराध्यक्ष यश साने, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अतिष बारणे, रविंद्र सोनवणे, उत्तम आल्हाट, प्रकाश सोमवंशी, कविता आल्हाट, आकाश पवार आदी या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते.

कोरोनामुळे मोदी सरकारने खासदार निधी बंद केला. खासदार निधी बंद असला तरीही भोसरीतील विकास कामे रखडू नयेत यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्य सरकारकडे विशेष पाठपुरावा केला. नागरिकांच्या मागणीनुसार राज्य सरकारकडून त्यांनी निधी आणला. दरम्यान, महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ योजनेअंतर्गत नगरविकास खात्याने 4 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे. त्यातून भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध भागातील, समाविष्ट गावात रस्ते, ओपन जीम बसवणे, अंतर्गत पाईप लाईन टाकणे, गल्ली बोळ रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण, अंतर्गत रस्ते फुटपाथ, रस्त्यांची सुधारणा याअंतर्गत केली जाणार आहे.महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने खासदार डॉ. कोल्हे यांनी भोसरी मतदारसंघावर खास लक्ष केंद्रित केले आहे.

डाॅ. कोल्हे म्हणाले, केंद्राने निधी बंद केला तरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे खंबीरपणे आपल्या पाठिशी आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. याच माध्यमातून नगरविकास खात्याकडून निधी मंजूर करुन विकास कामांचा शुभारंभ केला आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani