लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

चेअरमनसह ५ आरोपींना पोलीस कोठडी

हे राजकीय षडयंत्र आहे

lokvarta

लोकवार्ता । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षासह पाच जणांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. त्या प्रकरणी आज पुणे न्यायालयात स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, ज्ञानेश्वर पिंगळे (मुख्य लिपिक), विजय चावरिया (लिपिक), राजेंद्र शिंदे (संगणक चालक), अरविंद काळे (शिपाई) हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर शनिवारीपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी सुनावली. यावेळी नितीन लांडगे यांचे बंधू आमदार महेश लांडगे हे देखील न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. सुनावणीनंतर महेश लांडगे यांच्याशी प्रसार माध्यमांनी त्यांची भूमिका जाणून घेतली.

भाजपा आमदार महेश लांडगे यांची भूमिका
“हे राजकीय षडयंत्र आहे. याच्यामध्ये नितीन लांडगे आणि त्यांच्या परिवाराचा मागचा इतिहास पाहिला तर या कुटुंबानं समाजकारण केलेलं आहे. फार मोठा आदर्श या परिवाराचा या शहरामध्ये आहे. ज्या परिवाराची इतकी संपत्ती आहे. ते असं करणार नाही. ज्यांनी कुणी केलं आहे, त्यांनी हे प्लानिंग करून केलं आहे. बदनाम करण्यासाठी केलेलं आहे. यात कोणताही पुरावा नाही. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे.”, असं आमदार महेश लांडगे यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?
तक्रारदार हे जाहिरातीचा व्यवसाय करत असून पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या जागेमध्ये होर्डींग उभारण्याकरीता त्यांनी भरलेल्या २८ निविदा मंजुर झालेल्या होत्या. परंतु त्यांची वर्कऑर्डर न निघाल्याने तक्रारदार हे स्थायी समितीचे सभापती अॅडव्होकेट नितीन ज्ञानेश्वर लांडगे व त्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांना भेटले. तेव्हा, वर्क ऑर्डर मिळविण्यासाठी च्या करारनाम्यावर सही करण्यासाठी त्या २८ निविदांच्या बोली रक्कमेच्या (बीड अमाऊंट) ३ टक्के रक्कम म्हणजे १० लाख रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २ टक्केप्रमाणे सहा लाख रूपये घेण्याचे मान्य झाले. ६ लाख रूपयांची मागणी करून त्यापैकी तयार असलेल्या ६ करारनाम्यांच्या फाईल्सवर सही शिक्का देण्याकरीता २ टक्क्याप्रमाणे १ लाख १८ हजार लाच रक्कमेची मागणी करून ती तेथील लिपिक – विजय चावरिया, संगणक चालक राजेंद्र शिंदे व शिपाई, अरविंद कांबळे यांच्या मार्फत स्वीकारल्यावर या सर्वांना ताब्यात घेण्यात आले.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani