नारायणगावात 8000 हजार किलो गोमांस जप्त
गोरक्षक शिवशंकर स्वामी यांच्या प्रयत्नातून गोमांस केले जप्त.
पुणे । लोकवार्ता-
नारायणगावात 8000 हजार किलो गोमांस जप्त.दिं.7.6.22 रोजी रात्री पुणे नाशिक रोड ने आळेफाटा नारायणगाव मार्गे 407 टेम्पो क्र. MH43 AD 9243 गोमांस भरून मुंबई येथे जाणार असल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी श्री शिवशंकर स्वामी यांना मिळाली…स्वामींनी त्यांच्या विश्वासू सहकार्यांना सदर गाडीची माहिती कलवून नारायणगाव पोलिसांची मदत घेऊन सदर टेम्पो ताब्यात घेण्यास सांगितला. रात्री सुमारे 2 वा सु सदर टेम्पो पुणे नाशिक हायवेने येताना गोरक्षकांना दिसली. सदर टेम्पो पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अजुरुद्दीन शेख व किलनर अब्दुल खान दोघे रा. कुर्ला मुंबई. असे सांगून मालेगाव येथे गायी व बैल कापून त्याचे मांस मुंबई गोवंडी येथे घेऊन जात असल्याचे सांगितले,

पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली असता गायी व बैलाचे मुंडके , कातडी सोललेल्या अवस्थेत धड व पाय दिसून आले…पोलिसांनी गाडी चालक , गायी बैल कापणारे , गोमांस विकत घेणारे व टेम्पो मालक यांच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला व सर्व गोमांस डिस्पोज केले..!यावेळी कृष्णा माने यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. या कारवाईत शिवराज संगनाळे , कृष्णा माने , ऋषी जंगम , सुदर्शन वाजगे , कौस्तुभ सोमवंशी , संकर्षण वाव्हळ , ओंकार नायकोडी इ गोरक्षकांनी सहभाग घेतला..!