लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“माथाडी कामगार पॅटर्न वर देखील एक फिल्म बनायला हवी”-पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

“अंतिम” चित्रपटाच्या प्रमोशन साठी अभिनेता सलमान खान व चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पिंपरी चिंचवड मध्ये लावली हजेरी.

पिंपरी लोकवार्ता-

मराठीतील सुपरहिट ठरलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमाचा हिंदी रिमेक ‘अंतिम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता सलमान खान आणि चित्रपटाची संपूर्ण टिम पिंपरी – चिंचवड शहरात आली होती. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी शहरात ‘माथाडी कामगार पॅटर्न’ आहे त्यावर देखील एक फिल्म बनायला हवी अशी टिपण्णी केली
अभिनेता सलमान खान याची निर्मिती असलेला आणि महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘अंतिम’ हा चित्रपट आज (शुक्रवारी, दि.26) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठी मुळशी पॅटर्नच्या कथेवर आधारित हा सिनेमा मुळशी तालुक्यातील शेतजमीनी आणि त्यावरून झालेल्या गँगवॉरवर बेतलेला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता सलमान खान आणि चित्रपटाची संपूर्ण टिम बुधवारी (दि.24) पिंपरी चिंचवड शहरात आली होती. त्यावेळी एल्प्रो सिटी मॉल येथील कार्यक्रमाला पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश देखील उपस्थित होते.

चित्रपटाबाबत आयुक्त कृष्णप्रकाश यांना बोलण्यास सांगितले असता ते म्हणाले, ‘चित्रपटात पुण्यातील घटनांचा संदर्भ आहे, मुळशी आणि मावळ मधील घटना याच्याशी मिळत्या जुळत्या आहेत. त्याठिकाणी अशा घटना होत असतात. तसेच शहरात आणखी एक पॅटर्न आहे, ‘माथाडी कामगार पॅटर्न’, त्यावर देखील एक फिल्म बनायला हवी. कशा प्रकारे शोषण सुरू आहे, एकाधिकारीशाहीचा प्रयत्न सुरू आहे, हे दाखवायला पाहिजे.’

‘सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार सारखे कलाकार पोलिसांची शान वाढवतात, खाकी एक धर्म आहे तो दूरवर पोहचविण्याचे काम ते करतात. पोलिसांचा सामना समाजातीलच दुष्टप्रवृत्तीशी असतो, त्यांना शोधून कारवाई करणे पोलिसांचे काम असते,’ असे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani