भारतातील सर्वात मोठे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक मोशीत साकारणार
लोकवार्ता : राज्यभरातील शंभूभक्तांना अभिमान वाटावा, अशा दैदीप्यमान स्मारकाची निर्मिती करण्यात येत असून छत्रपती संभाजीराजे सृष्टीसाठी जवळपास ३० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या समोरच हा प्रकल्प उभा राहणार असल्याने मोशी- बो-हाडेवाडीला जगाच्या नकाशावर वेगळी ओळख मिळणार आहे. पुणे-नाशिक महामार्गावरून जाताना सहज दृष्टिक्षेपात पडणारा हा पुतळा येणा-या-जाणा-या सर्वांचे लक्ष वेधून घेईल. छत्रपती संभाजी महाराज शिल्प शहरातील सर्वांसाठी प्रेरणादायक ठरेल. अशा या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. या स्मारकामुळे तरुणांना नवीन प्रेरणा मिळणार आहे.

मोशी, बो-हाडेवाडीतील विनायक नगर भागात गट नंबर ५४४ व पेठ क्रमांक ५ व ८ च्या विस्तीर्ण परिसरात साधारण ३ एकर जागेवर छत्रपती संभाजीराजे सृष्टी विकसित केली जात आहे. या थीम पार्कमुळे मोशी, बो-हाडेवाडीला एक नवीन ओळख मिळणार असून शहराच्या नावलौकिकामध्ये मानाचा तुरा रोवला जाणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांचा पराक्रम तरुणांना नेहमीच प्रोत्साहन, प्रेरणा देते. त्यामुळे तरुणांसाठी हे स्मारक प्रेरणादायी ठरणार आहे. हे स्मारक मोशीकरांसह शहरवासियांना कायम प्रेरणा देणारे ठरणार आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकार होत आहे. यासाठीच्या जवळपास ३० कोटीच्या खर्चाची तरतूद पालिकेने केली आहे. महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागामार्फत विनायक नगर, बो-हाडेवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज थीम पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २ वर्षे प्रयत्न केल्यानंतर पालिकेच्या ताब्यात आलेल्या गट नंबर ५४४ च्या गायरान जमिनीचा वापर केला जाणार असून शंभूराजे सृष्टीच्या रूपाने बो-हाडेवाडीत हा भव्य प्रकल्प उभा राहत आहे. यामुळे मोशीच्या वैभवात भर पडणार असून हे राज्यभरातील शंभूभक्तांचे श्रध्दास्थान ठरणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य पराक्रमाची साक्ष देणारे, तरुणांना प्रेरणा देणारे असे हे स्मारक ठरणार असून बोऱ्हाडेवाडीत राज्यातील सर्वात मोठा संभाजीराजे मोशी, पुतळा उभारण्यात येत आहे. ज्याची उंची जमिनीपासून १४० फूट असणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तब्बल १०० फूट उंच पुतळ्याचे काम दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजित केले आहे. सुमारे ३ एकर जागेवर उभारण्यात येणार आहे. विशेष म्हण जगभरात प्रसिद्ध असलेले शिल्पकार राम सुत यांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याचे काम दिल अंतिम टप्प्यात आलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे साकारत असलेले हे स्मारक व इतिहास अभ्यासक, शिवशंभु प्रेमी तसेच विद्यार्थी तरुण न तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणार असून मोशी गावच्या सहराच्या नावलौकिकात भर घालणारा असा हा प्रकल्प असणार आहे.
वैशिष्ट्ये
छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प संपूर्ण ब्राँझचे असून प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हे शिल्प तयार करीत आहेत. या शिल्पाची उंची १०० फूट असून ४० फूट उंच चौथऱ्यावर तो बसविण्यात येत आहे. हे शिल्प पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पाडेल. हा प्रकल्प सुमारे ६.५ एकर क्षेत्रावर विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे ४५ कोटी खर्च अपेक्षित आहे.