पुणे महापालिकेत साकारला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य-दिव्य सिंहासनाधिष्ठ पुतळा!
-पुणे महापौर श्री. मुरलीधरजी मोहोळ यांची संकल्पना.
पुणे।लोकवार्ता-
सर्वांचे दैवत, शक्तिस्थान आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठ पुतळा आपल्या पुणे महापालिकेच्या हिरवळीत बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील जागेची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांसमवेतपुणे महापौर श्री. मुरलीधरजी मोहोळ यांनी आढावा घेतला. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले.

महापौर श्री. मुरलीधरजी मोहोळ यांच्या संकल्पनेतून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठ पुतळा महापालिकेच्या हिरवळीवर लवकरच बसवण्यात येत आहे. या कामाचा आढावा महापौर श्री. मोहोळ यांनी घेतला.
