पुण्याजवळील कंपनीला लागलेल्या आगीत ७ मृत्यू, १७ बेपत्ता
आगेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू

लोकवार्ता।प्रतिनिधी
पुणे : पुण्यालगतच्या पिरंगुट एमआयडीसी मधील उरवडे गावच्या हद्दीत असणाऱ्या सॅनिटायजर तयार करणाऱ्या एका कंपनीला भीषण आग लागली आहे. त्यामध्ये १५ ते २० कामगार अडकल्याची माहिती समोर आली आहे.

अग्नीशमन दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
आग मोठ्या प्रमाणात आहे. महिला कामगार यांचा सहभाग आहे. कंपनीत १५ ते २० जण आडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. आतापर्यंत ८ जणांचे मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
पिरंगुट भागात एस.व्ही.एस. अक्वा टेक्नॉलॉजी ही मोठी कंपनी आहे. या कंपनीत सध्या सॅनिटायझर बनवले जात असल्याची माहिती आहे. आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक या कंपनीत आग लागली. हा प्रकार समोर येताच अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. त्यानुसार दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून येथे खबरदारी म्हणून रुग्णवाहिका बोलवण्यात आल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आग मोठ्या प्रमाणात भडकलेली आहे.