लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

सहकारी गृहनिर्माण संस्थेतील ओल्या कचऱ्याच्या संदर्भात सोसायटी फेडरेशनची पिंपरी चिंचवड मनपाचे उपयुक्त श्री.अजय चारठाणकर यांच्या समवेत सकरात्मक बैठक पार

लोकवार्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड शहरातील मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचा ओला कचरा 2 ऑक्टोबर पासून न उचलण्याचा निर्णय घेऊन, ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था प्रतिदिन 100 किलो कचरा निर्माण करतात त्यांना नोटिसा दिलेल्या होत्या. या नोटिसा आल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील सोसायट्यांना विश्वासात न घेता घेतलेल्या निर्णयामुळे चिखली-मोशी पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनने पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त श्री. शेखर सिंग यांना पत्रव्यवहार करून महानगरपालिकेने जर ओला कचरा उचलणे बंद केले तर हा सर्व ओला कचरा पिंपरी चिंचवड मनपाच्या गेटवर आणून टाकण्याची आक्रमक भूमिका घेतली होती. सोसायटी फेडरेशनच्या या आक्रमक भूमिकेनंतर पिंपरी चिंचवड मनपाचे उपआयुक्त श्री.अजय चारठाणकर यांनी दिनांक 28 सप्टेंबरला रोजी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली.

पिंपरी चिंचवड

या बैठकीमध्ये महानगरपालिकेचे उपआयुक्त श्री.अजय चारठाणकर यांनी सकरात्मक भूमिका घेऊन सोसायटीधारकांच्या सर्व अडचणी समजून घेतल्या जातील आणि कोणतीही जबरदस्ती किंवा हटवादी भूमिका न घेता सोसायटीधारक व महानगरपालिका प्रशासन यांच्या समन्वयाने यावर तोडगा काढून याची अंलबजावणी केली जाईल असे अश्वासन दिले.

उपआयुक्त श्री.अजय चारठाणकर यांनी हे अभियान प्रामुख्याने तीन टप्प्यात राबवले जाईल असे सांगितले..

1) 2016 नंतरच्या मोठ्या प्रमाणात ओला कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांच्यासाठी पहिला टप्पा
2) 2016 च्या अगोदरच्या मोठ्या प्रमाणात ओला कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या दुसरा टप्पा
3) दैनंदिन 100 किलो पेक्षा कमी कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या तिसरा टप्पा

या तीन ही टप्यामध्ये हे अभियान राबविताना सोसायट्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेतल्या जातील. हौसिंग सोसायटी फेडरेशन आणि पिं.चिं. मनपा यांच्या समन्वयातून त्यावर योग्य तोडगा काढला जाईल. तोडगा निघेपर्यंत जबरदस्ती केली जाणार नाही. यावर मार्ग व तोडगा काढण्यासाठी 9 किंवा 10 ऑक्टोबरला पिंपरी चिंचवड मनपा तर्फे शहरातील मोठ्या सोसायट्यांचे पदाधिकारी व सोसायटी फेडरेशन पदाधिकारी यांची कार्यशाळा घेतली जाईल. त्यामध्ये या सोसायट्यांच्या सर्व अडीअडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधले जातील. हौसिंग फेडरेशनच्या मागणीप्रमाणे इंदोर शहराच्या धर्तीवर पिं.चिं.शहरात देखील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तो जिरवण्याच्या युनिट बाबत तपासणी केली जाईल आणि शक्य असल्यास ते उभारण्यात येतील.

2016 नंतरच्या मोठ्या गृहप्रकल्पात विकसकांनी ओला कचरा हा गृहप्रकल्पात जिरवण्याचे प्रकल्प करून देणे अनिवर्य असताना ते करून न दिल्याने बिल्डरवर नियमभंग केला म्हणून कारवाई करणे , तसेच पिं.चिं.मनपाच्या ज्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा गृहप्रकल्पास बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले यांच्यावर कारवाई करण्याची फेडरेशनने जी मागणी केली आहे. हे माझ्या अधिकार कक्षेत येत नाही. या सर्व गोष्टी माननीय आयुक्त साहेबांच्या अधिकारात येतात. फेडरेशनने यासाठी माननीय आयुक्त साहेबांच्या कडे पाठपूरावा करावा. माझे काम हे अभियान सोसायटीधारकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना सहकार्य करून हे अभियान यशस्वीपणे राबवणे हे आहे
– अजय चारठाणकर, उपायुक्त, पिं.चिं. मनपा.

जो पर्यंत 2016 नंतरच्या मोठ्या गृहप्रकल्पामध्ये ज्या विकसकानी नियम धाब्यावर बसवून ओला कचरा सोसायट्यांमध्ये जिरवण्याचे प्रकल्प उभारून दिलेले नाहीत त्यांच्यावर त्यांनी नियम भंग केला म्हणून कारवाई होत नाही, तसेच पिं.चिं. मनपाच्या बांधकाम विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांनी अशा गृहप्रकल्पाना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही. व सोसायट्यांच्या सर्व अडचणी दूर होत नाहीत, तोपर्यंत सोसायट्यातील कचरा उचलणे बंद करू नये.अन्यथा पिं.चिं.मनपास सोसायटी धारकांच्या रोषास सामोरे जावे लागेल.

– संजीवन सांगळे, अध्यक्ष -चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व लोकप्रतिनिधी माननीय 3 आमदार व दोन खासदार व सोसायटी फेडरेशन प्रतिनिधी यांची संयुक्त मिटिंग होऊन यावर योग्य तोडगा निघत नाही तोपर्यंत सोसायट्यांच्या कचरा उचलणे बंद करू नये ही विनंती. अन्यथा हा सर्व ओला कचरा पिं.चिं. मनपाच्या गेटवर आणून टाकला जाईल

– संजय गोरड, संघटक -चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन

शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून या सर्व सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक शेवटी यांच्या या सर्व ओल्या कचऱ्याबाबतच्या समस्या घेऊन आमच्याकडे येतील व पिं. चि. मनपा प्रशासन, सोसायटीधारक व लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्ष होऊन शहराचे वातवरण खराब होईल.त्यामुळे यावर सामंजस्याने तोडगा निघेपर्यंत सोसायट्यांचा ओला कचरा उचलणे बंद करू नये
– नितीनआप्पा काळजे,माजी महापौर -पिं. चिं. मनपा

सदर बैठकीस चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष श्री. संजीवन सांगळे, सचिव श्री. प्रकाश जुकंटवार, संघटक संजय गोरड, माजी महापौर श्री. नितीन आप्पा काळजे, फेडरेशन पदाधिकारी, सोसायट्यांचे चेअरमन,सेक्रेटरी,सभासद उपस्थित होते.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani