रिव्हर सायक्लोथॉनबाबत आज मोरवाडीत होणार पत्रकार परिषद
लोकवार्ता : आज शुक्रवार (दि.२५) दुपारी 12:30 वा. भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांची पत्रकार परिषद हॉटेल घरोंदा, मोरवाडी, पिंपरी येथे आयोजित करण्यात आली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिम्मित भारतातील सर्वात मोठ्या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. याच विषयाबाबत माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व पत्रकार, कॅमेरामन यांनी उपस्थिती दर्शवावी, ही विनंती करण्यात आली आहे.

पर्यावरण संवर्धन आणि इंद्रायणी नदी संवर्धनाचा संदेश देण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमी आणि अनेक संस्थांच्या सहकार्याने भारतातील सर्वात मोठी रिव्हर सायक्लोथॉन आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये होत आहे. येत्या रविवारी 27 तारखेला सकाळी 6 वाजता भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहाशेजारी होणार आहे. तरी या उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी डॉ. निलेश लोंढे, दिगंबर जोशी, शिवराज लांडगे, डॉ. आनंद पिसे, बापू शिंदे, कामगार नेते सचिन भैय्या लांडगे आदी उपस्थित राहणार आहेत.