लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

नादच केलाय थेट…

संतापामधून एकच फारच विचित्र घटना

लोकवार्ता । प्रतिनिधी

असा विचार करा की दिवसभर तुम्ही कामामध्ये एवढे गुंतून गेलात की तुम्हाला जेवणाला आणि साधी उसंत घ्यायलाही वेळ मिळाला नाही. त्यानंतर थकून भागून घरी पोहचल्यावर तुमच्या लक्षात येतं की घरी जेवण नाही किंवा जेवण व्हायला अजून वेळ आहे. त्यावेळी जी चीडचीड होते त्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. मात्र भुकेमुळे झालेल्या संतापामधून एकच फारच विचित्र घटना घडल्याची माहिती समोर आली असून या घटनेची इंटरनेटवर सध्या तुफान चर्चा सुरुय.

रेडइटवरील यू/एलसीव्हा-रिझर्व्ह६९९५ या युझरने त्याच्यासोबत घडलेला एक धक्कादायक घटनाक्रम सांगितला आहे. या व्यक्तीच्या मित्राने त्याला लग्नाचे फोटो काढण्यासाठी सांगितलं. कमी पैशांमध्ये मित्र म्हणून फोटो काढून देशील या बोलीवर दोघांची डील झाली. मात्र नंतर फोटो काढून झाल्यावर लग्नाच्या ठिकाणी या व्यक्तीला मित्राने जेवण देण्यास नकार दिला. त्यामुळे आधीच कमी पैशात काम करुन, फोटो काढून थकल्यानंतर जेवण नाकारल्याने या व्यक्तीने रागाच्या भरात लग्नाच्या ठिकाणीच कॅमेरामधील सर्व फोटो डिलीट केले.

ही पोस्ट रेडइटवर व्हायरल झाली आहे. २१ हजारांहून अधिक जणांनी या पोस्टला अपव्होट दिलं आहे. तर त्यावर २७०० हून अधिक मेंट आहेत. या पोस्टमध्ये संबंधित व्यक्तीने आपण प्रोफेश्नल फोटोग्राफर नसल्याचा उल्लेख केलाय. आपण केवळ हौस म्हणून कुत्राचे फोटो काढून सोशल नेटवर्किंगवर अपलोड करायचो असं त्याने म्हटलंय. इतकच नाही तर हे फोटो पाहूनच त्याच्या मित्राने लग्नामध्ये फोटो काढण्यासाठी त्याला बोलवलं. “त्याचं बजेट कमी असल्याने मी केवळ अडीचशे डॉलरमध्ये फोटोग्राफीसाठी होकार दिला. १० तासांच्या कार्यक्रमासाठी हे फारच कमी मानधन आहे,” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलंय.

दिवसभर फोटो काढताना आपल्याला कोणी खाण्यापिण्याबद्दल विचारलं नाही असाही उल्लेख पोस्टमध्ये आहे. आपल्याला या १० तासांमध्ये साधा २० मिनिटांचा ब्रेकही घेऊ देण्यात आला नाही असं या युझरने म्हटलं आहे. तसेच जमत नसेल तर पैसे मिळणार नाही अशी धमकीही त्याला देण्यात आली. त्यानंतर संतापलेल्या या व्यक्तीने नवरीसमोरच त्यांच्या लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले आणि तो लग्नाच्या ठिकाणावरुन निघून गेला.

आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल बोलताना तो म्हणतो, “तिथे एवढं काम होतं की मला त्यांनी २५० डॉलर देण्याचं मान्य केलेलं. पण त्यावेळी त्या ठिकाणी एक थंड पाण्याचं ग्लास आणि पाच मिनिटं विश्रांती मिळाली असती तर मीच त्यांना २५० डॉलर दिले असते.”

अनेकांनी कमेंट करुन या मुलाने योग्य निर्णय घेतल्याचं मत नोंदवलं आहे. फोटोग्राफर्सच्या कष्टाची अनेकांना किंमत नसते त्यांना असाच धडा शिकवला पाहिजे असं मत अनेकांनी व्यक्त केलंय. या फोटोग्राफरने योग्य केलं की अयोग्य यावरुन मतमतांतरे असली तरी त्याला देण्यात आलेली वागणूक चुकीची होती असं अनेकांचं मत आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani