मोशीतील ५०० मुलांना शिवनेरीची सफर
-युवा नेते निलेश बोराटे यांच्या वतीने मोशी परिसरातील मुलांना किल्ले शिवनेरीची सफर घडवण्यात आली.
मोशी। लोकवार्ता-
बालदिनाचे औचित्य साधून मोशीतील सामाजिक कार्यकर्ते नीलेश बोराटे यांच्यावतीने | मोशीतील बालमावळ्यांना शिवनेरीची नुकतीच सफर घडविण्यात आली. छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि आईसाहेब जिजाऊंचे संस्कार सर्वांच्या नसानसांत भिनविण्यासाठी तसेच गडकिल्ले संवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यात मोशी परिसरातील तब्बल पाचशे मुले सहभागी झाले होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या सहलीची सुरुवात झाली. सुरक्षित प्रवास करत सर्व बालमावळ्यांना संपूर्ण शिवनेरीचे दर्शन घडवण्यात आले..

अनुभवी ट्रेकर्स व अभ्यासकांच्या माध्यमातून लहान मुलांना शिवनेरी बाबत माहिती, छत्रपती शिवरायांचा इतिहास व त्यांचा पराक्रम सांगण्यात आला यावेळी इतिहास अभ्यासक विनायक खोत यांनी मार्गदर्शन केले. सर्व मुलांनी अतिशय जल्लोषाच्या वातावरणात छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीचे दर्शन घेतले
