इंडिया हॉकीच्या दिल्ली येथील द्विसदस्यीय शिष्टमंडळाने आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस दिली भेट
पिंपरी | लोकवार्ता-
हॉकी स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात इंडिया हॉकीच्या दिल्ली येथील द्विसदस्यीय शिष्टमंडळाने आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट दिली. महापालिकेच्या नेहरूनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडीयमची पाहणी करून तेथील सोयीसुविधांची त्यांनी माहिती घेतली.

या शिष्टमंडळामध्ये हॉकी इंडिया चे वरिष्ठ व्यवस्थापक विक्रम सिंग, कार्यालयीन समन्वयक प्रेम किशन यांचा समावेश होता तसेच समवेत स्थापत्य क्रीडा विभागाचे सहशहर अभियंता सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे, विद्युत विभागाचे सहशहर अभियंता संदेश चव्हाण, क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडाधिकारी अनिता केदारी आदी उपस्थित होते.
