”महाराष्ट्र का नेता कैसा हो… देवेंद्र फडणवीस जैसा हो…” ; पिंपरी- चिंचवड मध्ये भाजपची घोषणाबाजी
लोकवार्ता : राज्यसभेतील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. या यशानंतर पिंपरी-चिंचवड भाजपने घोषणाबाजी केली आहे. ”महाराष्ट्र का नेता कैसा हो… देवेंद्र फडणवीस जैसा हो…” असे नारे यावेळी लावण्यात आले. ही घोषणाबाजी पिंपरी-चिंचवड भाजपच्या कार्यालयासमोर करण्यात आली.
सहाव्या जागेसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दारुन पराभव केला. ही विजयाची घोडदौड यापुढील काळात कायम राहील, असे मत भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले. यावेळी महेश दादा लांडगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली या निवडणुकीत भाजपाने यश मिळवले. भाजपा उमेदवारांना मतदान करणाऱ्या सर्व आमदारांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच, पिंपरी-चिंचवडचे लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आजारी असतानाही मतदानासाठी विधानभवनात आल्या. हा भाजपाच्या विचारांचा आणि कर्तव्यनिष्ठेचा विजय आहे.
यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी महापौर माई ढोरे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, रवी अनासपुरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
