डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिनानिमित्त पिंपरी पोलीस आयुक्तालयाची बॅरिकेट्स वाटप
लोकवार्ता : काल डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिनानिमित्त पिंपरी पोलीस आयुक्तालयाची बॅरिकेट्स वाटप आले. यंदाचे वर्ष महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून सर्वत्र साजरे केले जाणार आहे. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

काल डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिनानिमित्त पिंपरी पोलीस आयुक्तालयाची बॅरिकेट्स वाटप आले. यंदाचे वर्ष महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून सर्वत्र साजरे केले जाणार आहे. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
आपण समाजाचे देणे लागतो हा विचार जनमानसात पोहचवणारे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी आयुष्यभर समाजासाठी आपले योगदान दिले. त्यांचा हा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम डॉ. आप्प्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन दादा धर्माधिकारी करत आहेत.
डॉ. आप्प्पासाहेब धर्माधकारी यांच्या जन्म दिवसाचे अवचित्त साधून पिमाप्री चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, टूल अलिबाग, जिल्हा रायगड च्या वतीने बॅरिकेट्स देण्यात आले. गेली अनेक वर्ष या प्रतिष्ठान मार्फत महाराष्ट्रभर विविध शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण आणि आरोग्य विषयक कार्यक्रम राबवले जातात.
वाकड पोलिस स्टेशन येथे झालेल्या या कार्यक्रमात हे बॅरिकेट्स पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलिस स्टेशन सत्यवान माने, पोलीस निरीक्षक गुन्हे १, वाकड पोलिस स्टेशन संतोष पाटील यांनी स्वीकारले. यावेळी पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग वाकड सुनील पिंजण, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे संतोष पाटील, पोलीस हवालदार दिपक गायकवाड आदी उपस्थित होते.