आषाढी वारीचं नियोजन ठरलं…
आषाढी वारीचं नियोजन ठरलं आहे. यंदा वारीचं नियोजन नेमकं कस असणार हे पाहुयात.. येत्या आषाढी वारीला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी २० जूनला तर संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी २१ जूनला पंढरपूराकडे प्रस्थान करणार आहे. यावर्षी तिथी वाढ असल्यानं इंदापूर मध्ये पालखीचा एक मुक्काम वाढेल. तसेच अंथुर्णे येथे पालखी मुक्कामी असणार आहे.

यंदा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ३३७ वे वर्ष आहे. संतोष मोरे, माणिक मोरे, विशाल मोरे यांची
पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. १० जुलैला पंढरपुरात आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. देहूच्या इनामदार वाड्यातून तुकोबांची पालखी २० जूनला प्रस्थान करेल. या सोहळ्यात ३२९ नोंदणीकृत दिंड्या आहेत. २०० हुन अधिक मोकळ्या दिंड्यांची संख्या आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून प्रस्थान करेल. यंदा वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता आहे.