समाजातून जाणीवपूर्वक बहिष्कृत केल्याची अभय भाट यांची तक्रार.. समाजाच्या संघटनेतील वरिष्ठांकडून अपमानस्पद वागणूक : अभय भाट
लोकवार्ता : कंजारभाट समाजामध्ये सामाजिक कार्य करणासाठी गेल्या चाळीस वर्षापूर्वी अखिल भारतीय संहसंमल भांतू समाज संघटना संघटना स्थापन करण्यात आली. याच संघटनेतील वरिष्ठ पदाधिकारी यांनी जाणीवपूर्वक समाजातून बहिष्कृत केल्याबाबतची तक्रार अभय खोंडीचंद भाट यांनी पत्रकाकाद्वारे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे केली आहे, संबंधित पत्रकात अभय भाट यांनी म्हटले आहे की, संघटना मुख्यतः बाढमेर ( राजस्थान) या ठिकाणी स्थापन करण्यात आली. संपूर्ण देशातील प्रत्येक राज्यातील लोकं या संघटनेमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत आहे. याआधी संघटनेत अनेकजण कार्य करून ही गेले.

संघटनेचे महत्वाचे पद म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष हेच आहे आणि हे पद गेल्या चार वर्षापूर्वी श्री सुनील मलके रा.कल्याणी नगर पुणे यांना देण्यात आले. श्री सुनील मलके साहेबानी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून लोकांची निवड करून वेग-वेगळ्या कमिटीचे नियोजन केले.मला ही महाराष्ट्र युवक अध्यक्ष पद दिले गेले मला पद लाॅकडाऊन काळात दिले गेले पदावर असताना गरीब लोकांना अन्नधान्य वाटत हाॅस्पिटलच्या अडचणी सोडवणे आणि सेनेटायर फवारणी असे कार्य करण्यास मी सुरूवात केली. आणि हे कार्य श्री सुनील मलके साहेबांचे सहकारी आणि संघटनेचे इतर पदाधिकारी यांना आवडली नाही त्यांना या कार्याची ईर्षा वाटू लागली म्हणून या लोकांनी संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमात मला बोलवायचे नाही आणि महाराष्ट्र युवक अध्यक्ष असूनसुध्दा पत्रकात किंवा बॅनरवर नाव टाकायचे नाही असे ठरवले पुणे जिल्हा अध्यक्ष श्री विष्णु नंदलाल भाट या साहेबानी तर सरळ सांगितले की
“”तू महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे ना महाराष्ट्रात काम कर पुणे जिल्ह्यात काहीच काम करायचे नाही जिल्ह्यामध्ये फक्त मीच काम करणार””
एखाद्या लग्नकार्यामधे सत्कार कार्यक्रमात माझे नाव माईक मध्ये घ्यायचे नाही अपमानीत करू लागले श्री सुनील मलके साहेबांना या प्रकाराबद्दल तक्रार ही केली पण काहीच उपयोग नाही झाला नाही.
वैतागून मला राजीनामा द्यावा लागला.हे पद मी फक्त एक वर्ष भोगले आणि ते ही कोरोनाकाळात. राजीनामा दिल्यानतंर कुणी विचारपूस ही करायला आले नाही थोडक्यात त्यांच्या मनासारखे झाले असावे.
पण ते इथेच थाबंले नाही हेच कृत्य माझ्या सोबत सारखे होऊ लागले आणि ते मी सहन करत राहीलो.मलके साहेबांनी आजीवन संघटनेचे सभासद
बनवण्यासाठी पाच हजार रूपये सभासद फी आकारली आणि ती मला घरच्या परिस्थितिमुळे देता आली नाही त्या नतंर समाजाच्या नावाने हरिद्वार येथे धर्मशाला बांधायची म्हणून प्रत्येक कुटूंबाकडून एक-एक लाख वर्गणी घेण्यात आली इतके पैसे आम्ही देऊ शकत नाही म्हणून आम्हाला जास्तच डावलू लागले काहींनी तर “”तू सभासद पण नाही असे सांगितले””
स्थानिक भाटनगर मध्ये गणपती आणि नवरात्रि उत्सवाच्या वेळेस मला आणि माझ्या मुलाला मडंळाच्या कमिटीत नाव सुध्दा टाकायचे नाही असे फरमान काढण्यात आले.माझा सक्का मेहूणा वारला असता माझाच दुसय्रा मेहुण्याने मयतात येऊ दिले नाही सगळ्यासमोर त्याने सांगितले
“”अभय भाट आमच्या मयतीत नाही पाहीजे”” आणि हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते कुणीच विरोध केला नाही किंवा मेहूण्याला समजावण्याचा प्रयत्न ही केला नाही. तरी ही मी हे सर्व कृत्य सहनच करत होतो.
पण आता हेच कृत्य या लोकांनी माझ्या मुला सोबतही सुरू केले. संघटनेच्या नावाने या लोकांनी अखिल भारतीय क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी केले आहे या टूर्नामेंट फक्त भाटसमाजाचेच खेळाडू क्रिकेट खेळणार आहे. प्रत्येक राज्यातून क्रिकेट संघ बोलावण्यात आले आहे आणि पुणे जिल्ह्यातून किमान आठ संघाना निमंत्रित केलेले आहे. माझा ही मुलगा क्रिकेट खेळतो आणि तो एक उत्कृष्ट क्रिकेटर ही आहे महाराणा टायगर्स स्पोर्ट्स क्लब या संघातून तो अनेक राज्यामध्ये क्रिकेट टूर्नामेंट खेळला पण आहे. महाराणा टायगर्स संघातर्फे दर वर्षी टूर्नामेंट ही भरवण्यात येते आणि या टूर्नामेंट मध्ये समाजचे सगळेच खेळाडू खेळतात.
पण संघटनेच्या नावाने होणारी टूर्नामेंट ही राष्ट्रीय टूर्नामेंट आहे आणि या टूर्नामेंट चे पत्रक महाराणा टायगर्स टिमला द्यायचे नाही असे ठरवले गेले केवळ माझा मुलगा नामे अक्षय अभय भाट या संघामध्ये असल्या कारणामुळे.
टूर्नामेंट पत्रकात मुद्दामच नियम टाकण्यात आला की “”या टूर्नामेंट मध्ये निम॔त्रीत संघ आणि निम॔त्रीत खेळाडूच खेळू शकतात”” असे नियम कोणत्याही टूर्नामेंट मध्ये ठेवले जात नाही हे मला माहीत आहे हे फक्त माझा मुलगा खेळू नये म्हणून नियम तयार करण्यात आला आहे.
टूर्नामेंट चे पत्रक मिळावे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुनील मलके साहेबांना लेखी स्वरूपात पत्रक देऊन टूर्नामेंट पत्रकाची मागणी ही केली पण त्यांना ठरल्यानुसार पत्रक देता आले नाही. टूर्नामेंटचे पत्रक महाराणा टायगर्स संघाला मिळाले नाही म्हणून मुलाने दुसय्रा संघातून खेळायचे ठरवले परंतु ज्या संघात त्याने नाव दिले त्या संघाच्या कर्णधारास धमकी देण्यात आली
“”अक्षय अभय भाट तुमच्या संघात असेल तर तुमचा संघ टूर्नामेंट मध्ये सहभागी होणार नाही “”
असे कृत्य… ही लोकं का करत आहेत हाच प्रश्न पडला आहे ? ना-ना प्रकारचे व्हिडीओ आणि स्टेटस तयार करून वाॅट्सआप वर टाकले जात आहे काही तर माझ्या मुलाला चिडवू पण लागले आहे की “” काय रे बॅन गोदडी मिळाली “” असे उच्चारू लागले आहे.
मी एक कार्यकर्ता असून सुध्दा मला जी वागणूक मिळाली तीच वागणूक आता माझ्या मुलाला ही मिळत आहे असे का ? आणि कधी पर्य॔त चालेल म्हणून मी आपणास या विनंती अर्जामार्फत न्याय मागत आहे कृपया आपण सहकार्य करून योग्य तो न्याय द्यावा अशी आग्रहपूर्वक नम्र विनंती करत आहे. अशी मागणी अभय खोंडीचंद भाट यांनी केली आहे.