मोशी येथील पत्रा शेड व बांधकामावरील कारवाई थांबण्यात यावी ;महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मागणी
-आयुक्त राजेश पाटील यांना पत्राद्वारे मागणी.
मोशी | लोकवार्ता-
कोरोना काळात कित्येक परिवाराचे हाल झाले होते. त्यातच आता कुठे गाडी रुळावर येत असताना पिंपरी चिंचवड महापालिकेने पत्राशेड व बांधकामांवर अतिक्रमण सुरु केले आहे. मोशी हद्दीतील 61 मी.पुणे नाशिक हायवे अंतर्गत पत्रा शेड व बांधकामवरील कारवाई थांबवण्यात यावी.. मोशीतील महा विकास आघाडीचे कार्यकर्ते आयुक्तांना भेटून निवेदन देण्यात आले . रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया देखील अजून सुरु नाही..त्या मुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान टाळावे..

ज्यावेळेस रस्त्याचे काम सुरु होईल.. स्वतःहून नागरिक बांधकाम काडुन घेतील असे नागरिकां कडून सांगण्यात आले. कोरोना महामारी नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुनर्वसनाचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झालेला आहे. दोन दिवसानंतर या संदर्भात निर्णय घेऊ. असे आयुक्त राजेश पाटील यांच्या कडून सांगण्यात आले आहे..या वेळी श्री.धनंजयभाऊ आल्हाट, विजय भाऊ सस्ते पाटील,व इतर सर्व महा विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते..