“जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते सत्कार”
-पिंपरी-चिंचवड युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे यांची माहिती.
पिंपरी | लोकवार्ता-
जागतिक महिला दिनानिमित्त युवा सेनेच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे यांनी दिली.
थेरगाव गणेशनगर येथील शिव कॉलनी सभागृहात मंगळवारी (दि. ८) सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे प्रमुख पाहुणे असणार आहेत. तर सरिता बारणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे म्हणाले, “अनेक महिलांनी अडचणींवर मात करत कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे. अशा अनेक कर्तृत्वान महिला समाजासाठी आदर्श आहेत. या महिलांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत प्रतिकूल परिस्थितीत कर्तृत्व सिद्ध केलेल्या तसेच परिवाराला सफल बनवणा-या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. असा कार्यक्रम थेरगाव परिसरात प्रथमच होत आहे. या सत्कारामुळे महिलांना पुढील जीवनात काम करण्याची प्रेरणा मिळेल”.