पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाचे नामकरण ‘सामान्य प्रशासन विभाग’
लोकवार्ता : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाचे नामकरण ‘सामान्य प्रशासन विभाग’ असे करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांनी असा आदेश काढला.

महापालिकेतील विभागांकरिता विविध संवर्गातील पदे निर्माण करण्यात आणि पालिकेच्या आकृतिबंधास राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली. आता प्रशासन विभागाला सामान्य प्रशासन विभाग असे नाव देण्यात आले आहे. महापालिकेच्या अंमलात असलेले सध्याचे सर्व सेवा प्रवेश नियम आणि त्यासंबंधी करण्यात आलेले ठराव, तसेच आदेशाचे अधिक्रमण करून पालिकेतील विविध पदांवर करावयाचे नियमन, सेवांचे वर्गीकरण करण्यासाठी सुधारित नियमांना शासनाने १८ फेब्रुवारी २०२० रोजीच्या अधिसूचनेद्वारे मंजुरी दिली आहे.
त्यामुळे महापालिकेच्या ‘प्रशासन’ विभागा ऐवजी ‘सामान्य प्रशासन विभाग’ असा उल्लेख करावा आणि महापालिकेचे सर्व दप्तरी दस्तऐवजात तशी नोंद व्हावी, असा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.