“महानगरपालिकेमध्ये आजपासून प्रशासकीय राजवट लागू “
-महापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, विविध समित्यांचे सभापती आणि नगरसेवक यांच्या पदापुढे आजपासून ‘माजी’ लागणार आहे.
पिंपरी | लोकवार्ता-
महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आजपासून प्रशासकीय राजवट सुरु झाली. आयुक्त राजेश पाटील हेच प्रशासक राहणार आहेत. महापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, विविध समित्यांचे सभापती आणि नगरसेवक यांच्या पदापुढे आजपासून ‘माजी’ लागणार आहे.
सहा टर्म पूर्ण झालेले सर्वांत ज्येष्ठ योगेश बहल यांच्या नावापुढे 30 वर्षानंतर पहिल्यांदाच ‘माजी’ नगरसेवक लागणार आहे. तर, चार टर्म झालेल्या मंगला कदम, अजित गव्हाणे यांच्यानावापुढेही 20 वर्षांनी ‘माजी’ लागणार आहे. तर, सलग चारवेळा निवडून आलेले आणि पाचव्यावेळी स्वीकृत असलेल्या भाऊसाहेब भोईर यांच्यापुढेही 25 वर्षांनी माजी लागणार आहे.

महापालिका दाधिकाऱ्यांचा कार्यकाळ 13 मार्च रोजी संपला. 13 मार्चच्या सायंकाळी महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, विषय समिती सभापती प्रभाग समिती सभापतींची वाहने पालिकेने ताब्यात घेतली. त्यांच्या कार्यालयांनाही टाळे ठोकण्यात आले. दिमतीला असणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही इतरत्र बदली केली जाणार आहे. आजपासून महापालिकेत आयुक्त राजेश पाटील प्रशासक म्हणून कार्यभार पाहणार आहेत.
लोकप्रतिनिधी नसले तरी प्रशासकीय कामांमध्ये यामुळे काहीही बदल होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आजपासून महापौर किंवा नगरसेवक म्हणून मिरवता येणार आहे. पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या नावापुढे ‘माजी’ लागणार आहे.