लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

कौतुकास्पद ! वाढदिवसानिमित्त राजगुरूनगर येथील दाम्पत्याचा अनोखा उपक्रम

स्वखर्चाने उचलला पुणे नाशिक महामार्गावरील कचरा.

पुणे | लोकवार्ता

राजगुरूनगर येथील एका पती-पत्नीने वाढदिवसानिमित्त पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्या पुलाजवळील मोठ्या प्रमाणात लोकांनी टाकलेला कचरा स्व खर्चातून जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलून नेत परिसर स्वच्छ केला. हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मभूमीत प्रवेश करताना परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, याची जाणीव ठेवावी ही अपेक्षा करता या परिवाराने वाढदिवशी सामजिक उपक्रम हाती घेत परिसर स्वच्छ केला आहे. राजगुरूनगर येथील संतोष उर्फ पप्पूशेठ मुरलीधर राक्षे आणि त्यांची पत्नी राणी संतोष राक्षे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाच्या हिताचे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून हे कार्य केले. राक्षे पती-पत्नीने हुतात्मा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष कैलास दुधाले यांच्याकडे सल्ला घेतला. त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हा उपक्रम राबविला.

राजगुरूनगर हे शहर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी कचरा पाहायला मिळतो. शहरातील पुणे-नाशिक महामार्गावर पडलेल्या कचऱ्याने दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे त्याठिकाणची स्वच्छता महत्त्वाची होती. हा दृष्टीकोन ठेवून समाजहित साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. राक्षे यांनी मग कोणताही विचार न करता शहराच्या जवळ असलेला हा कचरा स्वखर्चाने जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साह्याने उचलत संपूर्ण परिसर साफ करून वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम हाती घेतला.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani