सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बिबट्या जेरबंद
-वन विभागाने सुरक्षितपणे बिबट्याला घेतले ताब्यात.
चाकण । लोकवार्ता-
तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर चाकण एमआयडीसीतील बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.सकाळी 11:30 च्या सुमारास बिबट्याला यशस्वीरित्या बंद करण्यात आले. बिबट्या पिंजऱ्यात कैद होताच कंपनीतील कामगार व वनविभागासह, पोलीस प्रशासनाचा जीव भांडयात पडला आहे.नर जातीचा हा बिबट्या असून अडीच वर्ष वयाचा हा बिबट आहे या बिबट्या ला आता पुन्हा दुर नैसर्गिक आदिवासात सोडलं जाणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. वन विभागाने सुरक्षितपणे बिबट्याला ताब्यात घेतले आहे. चाकण एमआय डीसीतील मर्सिडीज बेंज कंपनीत पहाटेच्या सुमारास (Mercedes Benz) बिबट्या घुसल्याचे -पहाटेच्या सुमारास कंपनीच्या सुरक्षारक्षकाला बिबट्या दिसल्यानंतर हीबाब समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वन्यधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

पहाटेच्या सुमारास कंपनी च्या सुरक्षारक्षकाला बिबट्या दिसल्यानंतर ही बाब समोर आली.मात्र हा बिबट्या कंपनी आवारात कुठून आणि कसा आला हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्यानंतर तातडीने वन विभाग पोलीस यांना घटनेचीमाहिती देण्यात आली. त्यानंतर बिबट्या मर्सिडीज बेंज कंपनीमधील बॉडी शॉप मध्ये असल्याची खात्री करण्यात आली. पुढे पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.