लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“शरद पवार यांच्या पाठोपाठ चंद्रकांत पाटलांचं भर पाऊसात भाषण”

पुण्यातील कार्यक्रमात पाऊस चालू असताना देखील चंद्रकांत पाटील यांनी सुरु ठेवले भाषण

पिंपरी ।लोकवार्ता-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस भर पावसामध्ये घेतलेली एक सभा अशाच प्रकारचे ‘वारं फिरवण्यास’ कारणीभूत ठरल्याचा दावा राष्ट्रवादीकडून अनेकदा करण्यात आलाय. पवारांची पावसातील सभा आजही अनेकांच्या लक्षात आहे. मात्र पवारांच्या त्या पावसातील सभेची रविवारी पुणेकरांना पुन्हा आठवण करुन दिली ती भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी.

पुणे शहरातील नवी पेठेतील सेनादत्त पोलीस चौकीसमोरील चौकाचे नामकरण करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असे या चौकाचे नावे नाव ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आलं. फलक अनावरणानंतर मुख्य कार्यक्रम सुरुवात झाली. मात्र त्यानंतर काही वेळातच पावसाचेही आगमन झाले.

पाऊस पडू लागला तेव्हा चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू होते. मात्र त्यांनी पाऊस पडू लागल्यानंतरही मध्येच भाषण न थांबता सुरेश आप्पा माळवदकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. भर पावसामध्ये चंद्रकांत पाटील भाषण देत होते. बाजूला त्यांच्या मागेच एक व्यक्ती छत्री घेऊन उभी होती तर मंचावरील खुर्चांवर बसलेल्या काही मान्यवरांनाही डोक्यावर छत्री पकडली होती. मात्र चंद्रकांत पाटील हे पावसामध्ये भिजतच भाषण देत होते.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani