लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

गुणरत्ने सदावर्ते यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

-शरद पवार डर्टी पॉलिटिक्स करत असल्याचा त्यांचा आरोप.

मुंबई । लोकवार्ता-

मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर संप मिटल्याचे चित्र निर्माण झाले असताना, शुक्रवारी दुपारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या एका जत्थ्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर हल्ला केला.

आंदोलकांनी जोरदार निर्दशने करीत दगड, चप्पलफेक केली. महिलांनी बांगड्याही भिरकावल्या. आंदोलकांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यास सुरूवात झाली होती. या हल्ल्यामागे सूत्रधार कोण, याचा शोध सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा सदावर्ते यांना अटक करण्यात आली.

गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील-सदावर्ते यांनी पोलीस प्रशासन आणि शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत. शरद पवार डर्टी पॉलिटिक्स करतात असा आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे. तसेच गुणरत्न सदावर्तेची अटक बेकायदेशीर असल्याचा दावाही जयश्री पाटील यांनी केला आहे.

सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी कोणतीही नोटीस न देता मला ताब्यात घेतलं आहे. व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आहे. मला ताब्यात घेताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन करण्यात आलं नाही, असं सदावर्ते यांनी म्हटलं. तसेच माझ्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असंही ते म्हणाले. कष्ट करी हे कधीही कुणावर हल्ला करत नाहीत, असं सदावर्ते यांनी सांगितलं.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani