रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी रुपाली पाटील ठोंबरे यांचं नाव चर्चेत
पुणे | लोकवार्ता-
राष्ट्रवादीच्या नेत्या व राज्य महिला आरोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चाकणकरांनी राजीनामा देताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षातील अनेक महिलांनी यासाठी उत्सुकता दाखवली आहे. यात काही दिवसांपूर्वी मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेल्या रूपाली पाटील ठोंबरेही या पदासाठी इच्छुक असल्याचे बोल जात आहेत.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर आतापर्यंत त्यांच्याकडेच राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार होता. एका व्यक्तीकडे दोन पदे असू नयेत, म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या चांगलं काम करत आहेत.