लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या भावूक

-अनेक महिला कार्यकर्यांनी त्यांना राजिनामा देऊ नका अशी विनंती केली.

पिंपरी | लोकवार्ता-

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी काल राष्ट्रवादीच्या महिला विभागाच्या प्रदेशाध्यक्षा पदाचा राजीनामा दिला. “चाकणकर यांनी राजीनामा द्यायला नको होता”, असं राष्ट्रवादीच्या नेत्या, कार्यकर्त्यांचं मत आहे. काल चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या भावूक झाल्याचं पहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या एका महिला कार्यकर्तीला अश्रू अनावर झाले. “ताई काहीही करा, पण प्रदेशाध्यक्षपदाचा राजिनामा देऊ नका”, असं म्हणत या कार्यकर्त्यीने रडत-रडत आपल्या नेत्याचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत केला. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रूपाली चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी अनेकजण भावूक झाले. अनेक महिला कार्यकर्यांनी त्यांना “राजीनामा देऊ नका”, अशी विनंती केली. “ताई तुम्ही काहीही करा, पण तुम्ही राजीनामा देऊ नका. तुम्ही आमच्या नेत्या आहात. आम्हाला तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला आवडतं. त्यामुळे तुम्ही राजीनामा देऊ नका”, अशी या महिला कार्यकर्त्यांनी गळ घातली. पण चाकणकर आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजिनामा दिला.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani