अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उडाली खळबळ; राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी दाखल केला गुन्हा
लोकवार्ता : महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल वादग्रस्त वक्तव्य केलं. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी अब्दुल सत्तारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवड च्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अवताडे साहेब यांच्याकडे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून निवेदन देण्यात आले.
अब्दुल सत्तार यांनी “इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ”, असं म्हटलं. यानंतर पुन्हा एकदा सत्तार यांनी “ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत, आमचे खोके त्यांचे डोके तपासावे लागेल, ज्यांचे डोके तपासावे लागेल खोक्याची आठवण येऊ लागली आहे त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा आणि बाळासाहेबांनी गाजवलं भाषण | #shivsena
त्यांनतर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. यावेळी कविता खराडे, मनीषा गटकल, संगीता कोकणे, सुनीता अडसुळे, प्रफुल्ला मोतीलिग, सुप्रिया सोलांकुरे, मिरा कदम, सरिता झिब्रे, सुनीता आल्हाट, स्मिता पाटील उपस्थित होत्या.