पाणी प्रश्नांनंतर आत्ता चिखली करांची रुणालयासाठी संघर्ष
लोकवार्ता : चिखली येथील गायरान जमिनीवरील गट नंबर 1653, 1654 वरील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 20 जानेवारी 2021 रोजी मंजूर केलेले 850 खाटांचे रुग्णालय वनीकरण जमिनीचे कारण सांगून अचानक मोशी येथे हलव्यामुळे चिखली येथे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी प्रश्न आत्ताकुठे शांत होत असताना, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सापत्न भूमिकेवर शहरात आसूर्य व्यक्त केले जात आहे. याप्रश्री राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विकास साने यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
एक महिन्याचपूर्वी सत्ताधारी पक्षाची आणि महापालिका प्रशासनाने संगनमत करून रुग्णालय चिखली मधून हलवण्याचा घाट घातल्याचे लक्षात येताच महापालिकेला लेखी पत्र लिहून जाब विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याला महापालिकेने लेखी उत्तर देऊन रुग्णालय चिखली येथे होणार नसून ते मोशी येथे होणार असल्याचे सांगितले. प्रकरणाच्या अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता, वनीकरण जमीन असल्याने रुग्णालय होण्यास अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले मात्र, याच गायरान जमीन असलेल्या गट नंबर 1653 1654 यापूर्वीच जलशुद्धीकरणकेंद्र, जगद्गुरु तुकाराम महाराज संतपीठ हे उभारले गेले आहे. असे असले तरी सदर जमीन ही वनीकरणाच्या ताब्यात असली तरी, FCA 1980 (Forest Conservation Act) नुसार वनीकरणाच्या कायद्यात आवश्यक ते बदल करून, चिखली मधेच रुग्णालय उभारणे सहज शक्य आहे. याविषयीची माहिती मी स्वतः सेनापती बापट रोड, पुणे येथे वरीष्ठ अधिकान्यांची सविस्तर चर्चा करून घेतली असून, केवळ राजकिय हेतूने प्रेरित होऊन चिखली करांच्या हक्कावर गदा आणली जात असून, ग्णालय हे चिखली मध्येच होऊन देण्याचा निर्धार आम्ही सर्व गावकरी मंडळींनी केला आहे.
विकास साने
असे असताना हा निर्णय म्हणजे चिखली करांची उघड गळचेपी करण्याचा डाव आहे आणि हा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार याप्रसंगी विकास साने यांनी केला. येणाऱ्या काळात विकास साने विरुद्ध सत्ताधारी नेते हा संघर्ष कोणत्या वळणावर जातो हे बघणे औसुक्याचे राहणार आहे.