लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

ऐश्वर्यम हमारा सोसायटीने पटकावले आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद

-आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

मोशी । लोकवार्ता-

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी मोशी-चिखली परिसरातील सोसायटीधारकांसाठी सोसायटी प्रीमियर लीग फुलपीच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, मंगल जाधव, सोनम जांभुळकर, सागर हिंगणे, संतोष वारणे, मंगेश हिंगणे, निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे यांनी स्पर्धेच्या आयोजनात पुढाकार घेतला.

अंतिम सामन्यात पाल्म सोसायटी आणि ऐश्वर्यम हमारा सोसायटीमध्ये रंगतदार लढत झाली. यामध्ये ऐश्वर्यम हमारा सोसायटीने विजय मिळवला. गोल्ड पाल्मला उपविजेतेपद, तर डॉक्टर्स टीम वुड्स विले फेज-२ सोसायटीने तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले. अंतिम सामना पाहण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचे बंधु उद्योजक कार्तिक लांडगे, माजी उपमहापौर शरद बोन्हऱ्हाडे, हिरामन आल्हाट, महेंद्र वोराटे, अतुल वोराटे, बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते.

सोसायटी प्रीमियर लीग आमदार चपक-२०२२ स्पर्धेकरिता. कर्षक बक्षीसे ठेवण्यात आली. पहिल्या क्रमांसाठीसाठी ५१ हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांकासाठी ३१ हजार रोख, तृतीय क्रमांकासाठी २१ हजार रोख, चतुर्थ क्रमांसाठी ११ हजार रोख, पाचव्या क्रमांसाठी ७ हजार रोख, सहाव्या क्रमांसाठी ५ हजार रुपये रोख अशी प्रमुख बक्षीसे देण्यात आली. यासह सलग तीन विकेट, सलग तीन चौकार, सलग तीन पटकार, उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज अशा गुणवंत खेळाडुंनाही रोख स्वरुपात बक्षीसे देण्यात आली.अतिशय चुरशीची झालेली फायनल स्पर्धा पाण्यासाठी सुमारे ५ हजार लोकांनी क्रिकेटप्रेमींनी उपस्थिती दर्शवली.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani राष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022 महाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन ? | children day 2022 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj