“अजिंक्य बारणे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश”
प्रहार पक्षाचे पुणे जिल्हा युवा अध्यक्ष व पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य अजिंक्य दिलीप बारणे यानी नुकताच आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्ष सोडला अखेर, त्यांनी आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
पिंपरी। लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. केलास कदम यांच्या उपस्थितीत दिलीप बारणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, शहर युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

बारणे यांनी नुकताच जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांची पुढील भूमिका काय असणार किंवा ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याचे स्पष्टीकरण दिले नव्हते. आज त्यांनी अचानक काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने सर्व आश्चर्य चकित झालेत. निवडणूक जवळ येत असताना बऱ्याच नेत्यांनी पक्षाची स्थलांतरण सुरूच आहे. दिलीप बारणे यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काँग्रेस हा पक्ष सामाज्याच विकास करणारा पक्ष आहे,पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पडणार-अजिंक्य बारणे