“अजित गव्हाणे यांचे भाजपाला फिल्मी स्टाईल मध्ये प्रति आवाहन”
-हिमंत असेल तर भ्रष्टाचार व विकासावर सर्वपक्षीय बैठक बोलवा.
पिंपरी | लोकवार्ता-
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका भवनावर भ्रष्टाचाराचा मुद्दा घेत भाजपा विरोधात मोर्चा काढला होता. मोर्चाचा रंग पाहूण भाजपाने पत्रकावर पत्रके काढत राष्ट्रवादीच किती भ्रष्ट आहे, असा युक्तिवाद सुरू केला. सोशल मीडियावर भाजपाच्या टीमने राष्ट्रवादीला सरळ सरळ टार्गेट केले. आमदार महेश लांडगे यांनी भ्रष्टाचारावर चर्चा करायचीच तर राष्ट्रवादीची राज्यातील महाआघाडी सरकारची तसेच महापालिकेतील अनेक प्रकऱणे आपल्याकडे असल्याचा झाशा दिला. भ्रष्टाचारावर कशाला विकास कामावर १५ वर्षांत राष्ट्रवादीने किती कामे केली आणि ५ वर्षांत भाजपाने काय काम केले यावर समोरासमोर चर्चा करा, असे आव्हान आमदार लांडगे यांनी राष्ट्रवादीला दिले.

आ देखे जरा किसमे कितना है दम असे म्हणत भाजपाला प्रति आवाहन केले आहे. भाजपामध्ये खरोखर हिंमत असेलच तर त्यांनी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी आणि फक्त भ्रष्टाचार व विकास याच विषयावर चर्चा करावी असे चॅलेंज गव्हाणे यांनी दिले आहे.भाजपाचे नेते, नगरसवेक घाबरले कारण भ्रष्टाचाराच्या मुद्यावर त्यांचे पानीपत झाले असते आणि शहराचा विकास हा राज्यातील जनता जाणते की अजित पवार यांनीच केला आहे, त्यामुळे तिथेही हार खावी लागली असती. भाजपाची विकासाची संकल्पना निव्वळ व्हाटसएप इमेजवर आहे, असेही गव्हाणे यांनी स्पष्ट केले.